आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देश:गेल्या 24 तासांमध्ये विक्रमी 95 हजार 529 रुग्ण वाढले, 73 हजार 57 लोकांनी कोरोनावर केली मात, देशात आतापर्यंत 44.62 लाख प्रकरणं

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात बुधवारी 1168 लोकांचा मृत्यू झाला, आतापर्यंत या आजारामुळे 75 हजार 91 रुग्णांचा जीव गेला आहे
  • गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त 23 हजार 577 रुग्ण वाढले आहेत, येथे 13 हजार 906 लोक बरेही झाले

देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढून 44 लाख 63 हजार 106 झाली आहे. गेल्या 24 तासात 95 हजार 529 नवीन संक्रमितांची नोंद झाली. आतापर्यंत, एका दिवसात आढळलेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 6 सप्टेंबर रोजी 91 हजार 723 नवीन रुग्ण आढळले होते.

बुधवारी दिल्लीत विक्रमी 4 हजार 39 नवीन रूग्णांची नोंद झाली. यासह राज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 2 लाख 1 हजार 174 लोकांना संसर्ग झाला आहे. 1 लाख 72 हजार 763 लोक बरे झाले आहेत ही दिलास्याची बाब आहे. 4 हजार 638 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तर महाराष्ट्रात बुधवारी 23 हजार 577 नवीन रुग्ण आढळले. 13 हजार 906 लोक बरे झाले आहेत. तर 380 रुग्णांनी जीव गमावला आहे. राज्यात आतापर्यंत 9 लाख 67 हजार 349 लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 6 लाख 86 हजार 462 लोक बरे झाले आहेत. 2 लाख 52 हजार 734 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 27 हजार 787 लोकांचा मृत्यू झाला आहे.