आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देश LIVE:शायर राहत इंदौरी कोरोना पॉझिटिव्ह, देशात 24 तासांमध्ये 53016 रुग्ण वाढले, आतापर्यंत 22.67 लाख केस

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात सोमवारी 887 लोकांचा झाला मृत्यू, आतापर्यंत 45 हजार 353 लोकांचा कोरोनामुळे झाला मृत्यू सोमवारी महाराष्ट्रात सर्वात जास्त 9 हजार 181 आणि नंतर आंध्र प्रदेशात 7 हजार 665 संक्रमित आढळले

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळले आहेत. इंदौरमध्ये त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहत इंदौरी यांचे सुपुत्र सतलज यांनी याविषयी माहिती दिली. नंतर स्वतः राहत इंदौरी यांनी याविषयी ट्विट करत माहिती दिली.

दुसरीकडे पुद्दुचेरी दोन कॅबिनेट मंत्री कंडासामी आणि कमलकन्नन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी म्हणाले, 'मी संपर्कात असलेल्या लोकांना कोरोना टेस्ट करुन घेण्याचे आवाहन करतो.

देशात कोरोना रुग्णांचा आकडा 22 लाख 67 हजार 153 झाला झाला. दिलासादायक म्हणजे यामधील 15 लाख 81 हजार 640 लोक बरेही झाले आहेत. 24 तासांमध्ये 53 हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले. तामिळनाडूमध्ये संक्रमितांचा आकडा 3 लाखांपार गेला आहे. सोमावारी 5 हजार 914 नवीन रुग्ण वाढले.

बातम्या आणखी आहेत...