आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:गेल्या 24 तासांमध्ये केवळ 150 संक्रमितांचा झाला मृत्यू, हे 232 दिवसांमध्ये सर्वात कमी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोविड-19 चे आतापर्यंत 1 कोटी 4 लाख केस आढळले आहेत.

देशात रविवारी कोरोनाचे 16 हजार 85 नवीन रुग्ण आढळले. 16 हजार 735 रुग्ण बरे झाले आणि केवळ 150 संक्रमितांचा मृत्यू झाला. जीव गमावणाऱ्यांचा हा आकडा 232 दिवस म्हणजेच 23 मे नंतर सर्वात कमी आहे. तेव्हा एक दिवसात 142 संक्रमितांचा मृत्यू झाला होता.

देशात कोविड-19 चे आतापर्यंत 1 कोटी 4 लाख केस आढळले आहेत. यामधून 1 कोटी 92 हजार रुग्ण बरे जाले आहेत. तर 1.51 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 2 लाख 19 हजार 788 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

महाराष्ट्रात रविवारी 3558 लोक संक्रमित आढळले. 2302 लोक बरे झाले आणि 34 जणांचा मृत्यू झाला. येथे आतापर्यंत 19.69 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 18.63 लाख लोक बरे झाले आहेत. तर 50 हजार 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 54 हजार 179 वर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...