आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:अमेरिकेच्या तुलनेत भारतात जवळपास 3 पटींनी वाढतायत रुग्ण, देशात गेल्या 24 तासांमध्ये विक्रमी 96 हजार 760 संक्रमित, आतापर्यंत 45.62 लाख प्रकरण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात गुरुवारी 1 हजार 213 लोकांचा झाला मृत्यू, आतापर्यंत 76 हजार 322 रुग्णांनी गमावला जीव
  • गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त 23 हजार 446 रुग्ण वाढले आणि 14 हजार लोक बरेही झाले

देशात कोरोना प्रकरणाचे नवीन विक्रम समोर येत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 96 हजार 760 रुग्ण वाढले. यासोबतच रुग्णांची संख्या वाढून 45 लाख 62 हजार 730 झाली आहे. जर आपण सर्वात प्रभावी देश अमेरिकेशी तुलना केली तर गेल्या पाच दिवसांमध्ये भारतात रुग्णांची संख्या जवळपास तीन पटींनी वाढली आहे. गुरुवारी अमेरिकेमध्ये केवळ 38 हजार 811 केस आले आहेत आणि 1090 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तिकडे देशात मत्यूदरही कमी होत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये हा 1.70% नी कमी होऊन 1.67 वर आला आहे. मात्र पंजाप, छत्तीसगढ़, तामिळनाडू, उत्तराखंड, केरळ आणि आसाममधील वाढता मृत्यूदर चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे सर्वात जास्त प्रभावित राज्य गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगानासारख्या राज्यांमध्ये हा दर झपाट्याने कमी होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी 10 वाजता आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार गुरुवारी 96 हजार 551 रुग्ण आले आणि 1200 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशात संक्रमित होणाऱ्यांची एकूण संख्या वाढून 45 लाख 62 हजार 415 इतकी झाली. यापैकी 9 लाख 43 हजार 480 सक्रिय रुग्ण असून 35 लाख 42 हजार 664 रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 76 हजार 271 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser