आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:आता दर 10 लाख लोकसंख्येमध्ये 103 रुग्णांचा होतोय मृत्यू; केरळमध्ये प्रत्येकास मोफत लसी दिली जाणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोना रुग्णांचा आकडा 98 लाखांच्या पार गेला आहे.

देशात सध्या दर 10 लाख लोकांमागे 1.10 लाख लोकांची चाचणी केली जात आहे. यामध्ये 7 हजार रुग्ण सापडत आहेत तर 103 लोकांचा मृत्यू होत आहे. या आकडेवारीत वाढ होत आहे. पण जगातील टॉप-10 संक्रमित देशांमध्ये भारताची स्थिती या प्रकरणात बरीच चांगली आहे. अमेरिकेत दर 10 लाख लोकांमागे 49 हजार 108 लोक पॉझिटिव्ह आढळत आहे, तर 912 लोकांचा मृत्यू होत आहे. ब्राझिलमध्ये याच लोकसंख्येमागे 32 हजार रुग्ण आढळत आहेत आणि 846 मृत्यू होत आहेत.

केरळमध्ये सर्वांना मोफत लस

दरम्यान केरळ सरकारने राज्यात मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले की, राज्यातील सर्व लोकांना कोरोनाची लस मोफत दिली जाईल. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. केरळमध्ये मागील 24 तासांत 59 हजार 690 लोकांची चाचणी झाली आणि यामध्ये 5949 लोक संक्रमित आढळले. सध्या 60 हजार 29 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केरळमध्ये आतापर्यंत 6 लाख 1 हजार 861 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

11 राज्यांत देशातील 88.98% अॅक्टीव्ह रुग्ण

देशातील 88.98% अॅक्टीव्ह रुग्ण (ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत) 11 राज्यांत आहेत. या सर्व 11 राज्यांत 5% पेक्षा जास्त अॅक्टीव्ह रुग्णसंख्या आहे. याप्रकरणात हिमाचल प्रदेश टॉपवर आहे. येथे सध्या 16% रुग्णांवर उपचार सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकावर मणिपूर आहे. येथे 11.2% आणि केरळमध्ये 9% रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आतापर्यंत 98.31 लाख प्रकरणे

देशात आतापर्यंत 98 लाख 31 हजार 126 लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यातील 3 लाख 56 हजार 66 रुग्णांवर उपचार सुरू आहे तर 93 लाख 28 हजार 792 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 42 हजार 662 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser