आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासात केवळ 12 हजार 481 नवीन रुग्ण आढळले, हे 209 दिवसांमध्ये सर्वात कमी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात सोमवारी 2438 लोक संक्रमित आढळले.

देशात सोमवारी 12 हजार 481 कोरोना संक्रमित आढळले आहेत. हे 16 जूननंतर सर्वात कमी आहे. तेव्हा एका दिवसात 11 हजार 85 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. देशात काल 18 हजार 578 रुग्ण बरे झाले आणि 166 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस 6272 ने कमी झाल्या आहेत.

देशात आतापर्यंत 1.04 कोटी कोरोना संक्रमितांची ओळख पटली आहे. यामधून 1.01 लाख बरे झाले आहेत आणि 1.51 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2.13 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

महाराष्ट्रात सोमवारी 2438 लोक संक्रमित आढळले. 4286 लोक बरे झाले आणि 40 जणांचा मृत्यू जाला. येथे आतापर्यंत19.71 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 18.67 लाख लोक बरे झाले आहेत. तर 50 हजार 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 52 हजार 288 जणांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...