आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासात विक्रमी 97 हजार रुग्ण वाढले, 81 हजार संक्रमितांची कोरोनावर मात, देशात आतापर्यंत 46.57 लाख केस

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 77 हजार 506 लोकांचा मृत्यू झाला, 9.57 लाखांवर उपचार सुरू आहेत
  • महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा 10 लाखांच्या पार, 24 तासांमध्ये विक्रमी 24 हजार केस आल्या

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 46 लाख 57 हजार 379 लोकांना संसर्ग झाला आहे. शुक्रवारी 24 तासांत 97 हजार 654 कोरोना रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात संसर्ग होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे. गुरुवारी 96 हजार 760 नवीन रुग्ण आढळले होते.

दरम्यान, दिलासादायक बाब म्हणचे रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढत आहे. शुक्रवारी रुग्णालयातून विक्रमी 81 हजार 455 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांची ही संख्या सर्वाधिक आहे. यापूर्वी 8 सप्टेंबर रोजी 74 हजार 607 लोक बरे झाले होते. यासह, बरे झालेल्या लोकांची संख्या आता 36 लाख 21 हजार 438 वर गेली आहे.

संक्रमणामुळे आतापर्यंत 77 हजार 506 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 1202 रुग्णांचा मृत्यू शुक्रवारी झाला होता. सध्या 9 लाख 57 हजार 787 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे रुग्ण एकतर होम क्वारंटाइन आहेत किंवा रुग्णालयात दाखल आहेत. यामध्ये जवळपास 9 हजार रुग्णांची अवस्था गंभीर असल्याचे वृत्त आहे.