आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:आतापर्यंत देशात केवळ  11.01% नागरिकांचीच टेस्ट झाली; यामध्ये  6.44% लोक संक्रमित आढळले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 98 लाख 57 हजार 380 लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

138 कोटी लोकसंख्येमध्ये आतापर्यंत केवळ 11.74% म्हणजेच 15 कोटी 26 लाख लोकांचीच कोरोना टेस्ट होऊ शकली आहे. यामध्ये 6.45% म्हणजेच 98.57 लाख लोक संक्रमित आढळले. वेस्टिंगच्या आकड्यांवर नजर टाकली, तर देशात प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमाग 1.10 लाख लोकांची चाचणी होत आहे. अमेरिकमध्ये एवढ्याच लोकसंख्येमध्ये 6.55 लाख आणि ब्राझीलमध्ये 1.20 लाख लोकांची चाचणी होत आहे.

राजधानी दिल्लीमध्ये प्रत्येकी 100 मधून 33 लोकांची चाचणी झाली आहे
देशाच्या टॉप-10 संक्रमित राज्यांमध्ये सर्वात जास्त टेस्टिंग राजधानी दिल्लीमध्ये झाल्या आहेत. येथे दोन कोटींच्या लोकसंख्येमागे आतापर्यंत 33.61% लोकांची तपासणी झाली आहे. म्हणजेच प्रत्येकी 100 नागरिकांमध्ये 33 लोकांची कोरोना टेस्ट होत आहे. या प्रकरणात आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे आतापर्यंत 21.36% आणि केरळमध्ये 6.16% लोकांची तपासणी झाली आहे. लोकसंख्येच्या हिशोबाने देशातील सर्वात मोठे राज्यत उत्तर प्रदेशात 9.37% म्हणजेच 2.1 कोटी लोकांची चाचणी झाली आहे.

आतापर्यंत 98.57 लाख केस
देशात आतापर्यंत 98 लाख 57 हजार 380 लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 3 लाख 54 हजार 904 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 93 लाख 56 हजार 879 लोक बरे झाले आहेत. 1 लाख 43 हजार 055 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser