आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासांमध्ये जवळपास 16 हजार रुग्ण आढळले, यामधून 10 हजार 5 राज्यांमध्ये, सर्वात जास्त 5507 केरळमध्ये

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात मंगळवारी 2936 लोक कोरोना संक्रमित आढळले.

देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 15 हजार 903 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामधून 10 हजार 616 रुग्ण केवळ पाच राज्य, केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आढळले. सर्वात जास्त 5507 पॉझिटिव्ह रिपोर्ट केरळमध्ये समोर आले. हा सलग तिसरा दिवस होता जेव्हा रुग्णांची संख्या 17 हजारांनी कमी राहिली. यापूर्वी 9 जानेवारीला 18 हजार 453 रुग्ण आढळले होते.

मंगळवारी 17 हजार 747 रुग्ण बरे झाले आणि 200 जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 1 कोटी 4 लाख 93 हजार 758 लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1 कोटी 1 लाख 25 हजार 425 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आता 1 लाख 51 हजार 525 झाली आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

तर महाराष्ट्रात मंगळवारी 2936 लोक कोरोना संक्रमित आढळले. 3282 रुग्ण बरे झाले आहेत आणि 50 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 19.74 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 18.71 लाख लोक बरे झाले आहेत. 50 हजार 151 लोकांनी जीव गमावला आहे. तर 51 हजार 892 जणांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...