आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 98.84 लाख झाला आहे. यामधून 93.87 लाख रुग्ण बरे जाले आहेत. 1.43 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि 3.51 लाख जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकूण संक्रमितांचा आकडा 99 लाखांच्या पार जाऊ शकतो. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अॅक्टिव्ह केस म्हणजेच ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्या रुग्णांची संख्या 3.50 लाख होऊ शकते. डिसेंबरच्या 13 दिवसांमध्येच ही 76 हजार 363 अॅक्टिव्ह केस कमी झाले आहेत.
रविवारी देशात 27 हजार 336 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 30 हजार 729 रुग्ण बरे झाले आहेत आणि 338 जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.
तर महाराष्ट्रात 3717 लोक गेल्या 24 तासांमध्ये संक्रमित झाले आहेत. 3083 लोक बरे झाले आहेत आणि 70 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 18 लाख 80 हजार 416 लोक संक्रमित झाले आहेत. यामधील 74 हजार 104 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 17 लाख 57 हजार रुग्ण बरे झाले आहेत. संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आता 48 हजार 209 झाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.