आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:सलग 17 व्या दिवशी 40 हजारांपेक्षा कमी केस आल्या, तीन दिवसांमध्ये एकूण केस एक कोटींच्या पार होण्याची शक्यता

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 99.32 लाख केस समोर आल्या आहेत.

देशात कोरोना संक्रमितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मंगळवारी 26 हजार 251 नवीन केस आल्या आहेत. 33 हजार 853 रुग्ण बरे झाले आहेत आणि 383 जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे 8 हजार 8 अॅक्टिव्ह केस कमी झाल्या आहेत. देशात आतापर्यंत 99.32 लाख केस समोर आल्या आहेत. यामधून 94.55 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 1.44 लाख जणांचा मृत्यू झाला आहे आणि 3.30 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

प्रत्येक दिवशी जवळपास 25-30 हजार केस समोर येत आहेत. अशामध्ये पुढच्या तीन दिवसांमध्ये एकूण संक्रमितांचा आकडा एक कोटींच्या पार होऊ शकतो. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

महाराष्ट्रात मंगळवारी 3442 लोक संक्रमित आढळले. 4395 लोक बरे झाले आणि 70 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 18 लाख 86 हजार 807 लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 71 हजार 356 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 17 लाख 66 हजार 10 रुग्ण बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता 48 हजार 339 झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...