आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:सलग 9 व्या दिवशी 20 हजारांपेक्षा कमी राहिला नवीन संक्रमितांचा आकडा, 15 राज्यांमध्ये 100 पेक्षा कमी रुग्ण आढळले

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात शुक्रवारी 3145 लोक संक्रमित आढळले.

देशात शुक्रवारी कोरोना संक्रमणाचे 15 हजार 151 नवीन रुग्ण आढळले. 16 हजार 801 जणांनी कोरोनावर मात केली आणि 176 जणांचा मृत्यू झाला. सलग 9 व्या दिवशी 20 हजारांपेक्षा कमी केस समोर आल्या. यापूर्वी या महिन्यात 1 जानेवारी आणि 6 जानेवारीला 20 हाजरांपेक्षा जास्त रुग्ण समोर आले होते.

राज्यांमधील संक्रमणाविषयी बोलायचे झाले तर सर्वात जास्त 5624 प्रकरणे केरळमध्ये समोर आले, 3145 रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याने महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिला. याव्यतिरिक्त कोणत्याही राज्यामध्ये हा आकडा 800 पेक्षा जास्त नाही. 15 राज्यांमध्ये तर नव्या कोरोना रुग्णांचा आकडा 100 पेक्षाही कमी राहिला. देशात आतापर्यंत 1.05 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 1.01 कोटी बरे झाले आहेत. 1.52 लाख लोकांनी महामारीमुळे जीव गमावला आहे. आता 2.08 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात शुक्रवारी 3145 लोक संक्रमित आढळले. 3500 लोक बरे झाले आणि 45 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 19.84 लाख लोकांना संक्रमण झाले आहे. यामधून 18.81 लाख लोक बरे झाले आहेत. तर 50 हजार 336 जणांचा मृत्यू झाला आहे. 52 हजार 152 रुग्ण असे आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...