आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:24 तासात केवळ 18 हजार संक्रमित आढळले, हे गेल्या 6 महिन्यात सर्वात कमी, उपचार करत असलेल्या 15 हजार रुग्णांमध्ये घट

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 99.50 लाख लोक कोरोना संक्रमित झाले आहेत.

देशात कोरोना संक्रमितांच्या आकड्यांनी बुधवारी मोठा दिलासा दिला. केवळ 18 हजार 164 नवीन केस समोर आल्या आहेत. हे 24 जूननंतर सर्वात कमी आहे. तेव्हा 16 हजार 868 केस आल्या होत्या. गेल्या 24 तासांमध्ये 33 हजार 350 रुग्ण बरे झाले आहेत. 356 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 15 हजार 563 ची घट झाली आहे. ही जवळपास दीड महिन्यामध्ये सर्वात जास्त आहे. यापूर्वी 2 नोव्हेंबरला 21 हजार 447 अॅक्टिव्ह केस कमी झाल्या होत्या.

देशात आतापर्यंत 99.50 लाख लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. यामधून 94.89 लाख लोक बरे झाले आहेत आणि 1.44 लाख जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.

तर महाराष्ट्रात आकड्यांमध्ये काही सुधारणा झाल्या आहेत. 5914 केस कमी आल्या आहेत. 3887 रुग्णही बरे झाले आहेत. 95 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे आतापर्यंत 18.80 लाख केस आल्या आहेत.17.69 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 48 हजार 434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण 61 हजार 454 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...