आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:बरे झालेल्या रुग्णांची संख्या 95 लाखांच्या पार, अॅक्टिव्ह केसही झाल्या कमी; आतापर्यंत एकूण  99.79 लाख केस

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 95% पेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत.

देशात कोरोनातून रिकव्हर होणाऱ्या रुग्णांची संख्या 95 लाखांच्या पार झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 30 हजार 891 पेक्षा जास्त लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 26 हजार 754 नवीन केस समोर आल्या आहेत. या दरम्यान 338 लोकांनी जीवही गमावला आहे. देशात आतापर्यंत एकूण 95 लाख 20 हजार 44 लोक बरे झाले आहेत. संक्रमितांचा एकूण आकडा 99 लाख 77 हजार 834 एवढा आहे.

अशाप्रकारे देशात आतापर्यंत 95% पेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. अॅक्टिव्ह केसची संख्या सातत्याने कमी होत आहे. अॅक्टिव्ह केस म्हणजेच ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, त्यांची संख्या 3 लाख 13 हजार 831 एवढी आहे. तर एक लाख 44 हजार 789 लोकांनी जीव गमावला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

दिल्लीमध्ये कोरोनाच्या वेगावर नियंत्रण येत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी येथे 90 हजारांपेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्या, यामध्ये कोरोनाचे केवळ 1363 रुग्ण समोर आले. यापूर्वी 31 ऑगस्टला 1358 प्रकरणे समोर आले होते. तर 2391 लोकांनी कोरोनावर मात दिली आणि 35 लोकांनी जीव गमावला.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 3880 केस समोर आल्या. 4358 रुग्ण बरेही झाले आहेत आणि 65 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 18.84 लाख केस समोर आल्या आहेत. तर 17.74 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 48 हजार 499 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण 60 हजार 905 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...