आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासात 9972 रुग्ण आढळले, हे 224 दिवसात सर्वात कमी; अॅक्टिव्ह प्रकरणेही 2 लाखांपेक्षा कमी झाले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 1.05 लाख लोक संक्रमित झाले आहेत.

देशात गेल्या 24 तासांमध्ये 9,972 नवीन संक्रमितांची ओळख झाली आहे. 17,116 रुग्ण बरे झाले आहेत आणि 137 जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन संक्रमितांचा आकडा 8 जूननंतर सर्वात कमी आहे. तेव्हा 8,536 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तिकडे अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजे उपचार सुरू असलेल्या रुग्णांचा आकडाही दोन लाखांपेक्षा कमी 1.97 लाख झाला आहे.

देशात आतापर्यंत 1.05 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 1.02 लाख रुग्ण बरे जाले आहेत. तर 1.52 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात रविवारी 3081 नवीन कोरोना केस आढळल्या, 2342 रुग्ण बरे झाले आणि 50 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 19.90 लाख लोकांना संक्रमण झाले आहे. यामध्ये 18.86 लाख लोक बरे झाले आहेत. तर 50,738 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 52,653 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना अपडेट्स

  • दरम्यान भारत कोरोना व्हॅक्सीन कोवीशील्डचे 20 लाख डोज बांग्लादेशला गिफ्ट करणार आहे. या खेप 20 जानेवारीला पाठवण्यात येतील.
  • सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (SCBA) ने सोमवारी केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहून व्हॅक्सीनेशनमध्ये जज, अधिवक्ता आणि ज्यूडिशियल स्टाफला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. असोसिएशनने म्हटले की, यामुळे कोर्टचे कामकाज लवकर नॉर्मल होऊ शकेल.
बातम्या आणखी आहेत...