आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना देशात:24 तासात 93 हजार संक्रमित आढळले, 95 हजार झाले बरे, 232 दिवसात सहाव्या वेळी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त, आतापर्यंत 53 लाख केस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 10.18 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत, 8 हजारांपेक्षा जास्त रुग्ण गंभीर आहेत
  • देशात आतापर्यंत 84 हजार 717 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे, रोज 10-11 लाख टेस्ट होत आहेत

शुक्रवारी देशात 92 हजार 969 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, दिलासादायक म्हणजे, 95 हजार 512 बरे देखील झाले आहेत. देशात कोरोना येऊन आता 232 दिवस झाले आहेत. एवढ्या दिवसात सहाव्यांदा असे झाले की, नवीन संक्रमितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचा आकडा जास्त आहे. सर्वात पहिल्यांदा असे 14 फेब्रुवारीला झाले होते. जेव्हा केरळमध्ये मिळालेले तीन संक्रमित बरे झाले होते, मात्र त्या दिवशी नवीन केस आल्या नव्हत्या.

देशात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 53.05 लाख रुग्ण आढळले आहेत. यापैकी 42 लाख 5 हजार 201 लोक बरे झाले आहेत. 10 लाख 15 हजार 981 रूग्णांवर उपचार सुरू आहेत, तर एकूण 85 हजार 625 लोकांचा बळी गेला आहे. हे आकडे कोविड 19india.org वरून घेतले आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात शुक्रवारी 21 हजार 656 केस आल्या. येथे आतापर्यंत 11 लाख 67 हजार 496 केस आल्या आहेत. 8 लाख 34 हजार 432 संक्रमित झाले आहेत. तर 3 लाख 887 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 31 हजार 791 जणांचा मृत्यू झाला आहे.