आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:22 राज्यांच्या 140 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा वेग वाढला; भारत सर्वात जास्त अ‌ॅक्टिव्ह रुग्णांच्या यादीत पुन्हा जगात 13 व्या क्रमांकावर पोहोचला

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात सध्या 1.65 लाख अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजेच एवढ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

22 राज्यांच्या 140 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 22 राज्यांच्या 140 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आलेख वर जाताना दिसत आहे. म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 10 दिवसांपूर्वी म्हणजेच 22 जानेवारीपर्यंत असे 122 जिल्हे होते. सर्वात जास्त महाराष्ट्राचे 36 जिल्हे प्रभावित आहेत. या व्यतिरिक्त केरळचे 9, तामिळनाडूचे 7, पंजाब आणि गुजरातचे 6-6 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत प्रत्येक दिवशी कोरोनाचे जास्त रुग्ण समोर येत आहेत.

भारतात सध्या 1.65 लाख अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजेच एवढ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात देश जगात पुन्हा 13 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वीपर्यंत भारत देश 15 व्या क्रमांकावर होता. याच्या 10 दिवसांपूर्वी टॉप-15 संक्रमित देशांच्या यादीतून बाहेर आला होता. अशा प्रकारेच रोज कोरोनाचे रुग्ण आढळण्याच्या प्रकरणात भारत आता 4-5 व्या क्रमांकावर आला आहे.

24 तासांमध्ये 11 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले
सोमवारी देशभरात 11,563 लोक कोरोना संक्रमित आढळले. 11,990 लोक बरे झाले आणि 80 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1.11 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1.07 कोटी पेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. 1.57 लाख रुग्ण असे आहेत ज्यांचा मृत्यू झाला आहे. तर 1.65 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...