आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना अपडेड:देशातील एकूण रुग्णसंख्या 29 लाखांच्या पुढे; गुरुवारी महाराष्ट्रात 14,647 रुग्णांची नोंद तर 326 मृत्यू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील एकूण संक्रमितांची संख्या 29 लाखांच्या पुढे गेली आहे. गुरुवारी 65,235 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली तर 955 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच देशातील एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 53,950 झाली आहे. चांगली बाब म्हणजे 21,53,420 पेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 6,92,160 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात 14,647 रुग्णांची गुरुवारी नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील एकूण रुग्णसंख्या 6,43,289 झाली आहे. तसेच, एकूण मृतांचा आकडा 21,359 झाला आहे. सध्या राज्यात 1,62,491 रुग्णांवर उपचार सुरू असून, 4,59,124 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

यातच, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत कोरोना संक्रमित झाले आहेत. शेखावत यांनी गुरुवारी ट्वीट करुन माहिती दिली. 52 वर्षीय शेखावत जोधपूरचे खासदार आहेत. त्यांनी सांगितले की, सध्या मी दिल्लीत आहे, पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात अॅडमिट झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी तात्काळ आयसोलेट व्हावे किंवा चाचणी करुन घ्यावी.

यापूर्वी जयपूरचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र जोशी यांना काल कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. जोशी दोन दिवसांपू्र्वी शेखावत यांच्यासोबत काही कार्यक्रमात सामील झाले होते. राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनीही शेखावत आणि जोशीसोबत काही कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...