आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासात विक्रमी 12 लाख चाचण्या झाल्या, यामधील 92 पॉझिटिव्ह तर सलग दुसऱ्या दिवशी संक्रमितांपेक्षा जास्त लोक झाले बरे, देशात 53.98 लाख केस

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 86 हजार 774 लोकांनी गमावला जीव, 10.10 लाख रुग्णांवर सुरू आहे उपचार
  • ऑक्सफोर्ड व्हॅक्सीनच्या अखेरच्या टप्प्याची ट्रायल उद्यापासून पुण्यात सुरू होणार

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 53 लाख 98 हजार 230 झाली आहे. गेल्या 24 तासात, 1.2 दशलक्षाहून अधिक लोकांची तपासणी झाली. एका दिवसात ही सर्वाधिक चाचणी आहे. या 12 लाख लोकांमध्ये 7.66% म्हणजेच 92 हजार 574 नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत 42 लाख 99 हजार 724 लोक बरे झाले आहेत. शनिवारी रुग्णालयातून 94 हजार 384 रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.

दिलासादायक म्हणजे सलग दुसरा दिवस होता जेव्हा देशात संक्रमितांपेक्षा जास्त कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली. यासोबतच, रुग्णांच्या रिकव्हरीच्या बाबतीत भारत आता अव्वल क्रमांकावर आला आहे. आतापर्यंत इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त रुग्ण बरे झाले आहेत. अमेरिका आता दुसर्‍या क्रमांकावर पोहोचली आहे.

मृतांचा आकडा 86 हजारांच्या पार
शनिवारी देशात 1,149 संक्रतांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यासोबतच मृतांची संख्या आता 86 हजार 774 झाली आहे. सध्या 10 लाख 10 हजार 975 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे रुग्ण घरात राहून किंवा रुग्णालयातून आपले उपचार करुन घेत आहेत. यामध्ये जवळपास 9 हजार रुग्णांची अवस्था गंभीर आहे.

उद्यापासून कोरोना व्हॅक्सीनची अखेरची ट्रायल सुरू होणार
कोरोनासाठी तयार करण्यात येणाऱ्या ऑक्सफोर्ड व्हॅक्सीनची अखेरची आणि फेज-3 ट्रायल सोमवारी पुणेमध्ये सुरू होईल. यासाठी 150 ते 200 वालंटियर्स डोज घेण्यासाठी तयार आहेत.

बातम्या आणखी आहेत...