आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:16 राज्यांत वाढले 4 हजार अॅक्टीव्ह रुग्ण, नोएडा-गाझियाबादमध्ये आता लग्नसमारंभात केवळ 100 लोकांना मंजूरी

नवी दिल्ली3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • IAS अकॅडमी मसूरीमध्ये 33 ट्रेनी अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

मागील 24 तासांत 16 राज्यांत 4016 अॅक्टीव्ह रुग्ण वाढलेत. यात 16 राज्यांत उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा यासारखी मोठी राज्ये समाविष्ट आहेत. सध्या या राज्यात अधिक सक्रिय रुग्णांची संख्या वाढत नसली तरी येत्या काळात ही आकडेवारी त्रासदायक ठरू शकते. सध्या महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकात 2 लाख 37 हजार पेक्षा जास्त अॅक्टीव्ह रुग्ण आहेत, ही संख्या एकूण अॅक्टीव्ह रुग्ण 4.40 लाखची 54% आहे.

यादरम्यान दिलासादायक बाब म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 1% वाढून 94% झाला आहे. आता दर 100 रुग्णांपैकी 94 लोक बरे होत आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या 90 लाख 54 हजार 527 झाली आहे. यातील 4 लाख 39 हजार 395 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 84 लाख 80 हजार 299 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात कोरोनामुळे आजपर्यंत 1 लाख 32 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या राज्यांमध्ये वाढली अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या

राज्यअॅक्टीव्ह रुग्ण
राजस्थान755
उत्तर प्रदेश600
मध्य प्रदेश602
हरियाणा571
छत्तीसगड

396

गुजरात373
पंजाब310
जम्मू काश्मीर118
मेघालय92
पदुच्चेरी52
मणिपूर52
नागालँड48
दादरा आणि नगर हवेली16
चंदिगड16
आसाम12
अंदमान निकोबार03

IAS अकॅडमी मसूरीमध्ये 33 ट्रेनी अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी, मसूरी येथे 33 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अ‍ॅकॅडमीच्या पाच वसतिगृहे क्षेत्रांना कंटेन्ट झोन बनवण्यात आले आहे. यासह, अकॅडमी 48 तासांसाठी सील केली गेली.

पीएम मोदींनी दिली व्हॅक्सिनची स्थिती घेतली जाणून
शुक्रवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना लसीच्या स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत विकास, मान्यता व लस खरेदी या विषयावर चर्चा झाली. पंतप्रधानांच्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली. त्यात लसीचे प्राधान्य गट, आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणे, कोल्ड चेन पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.