आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासात 87393 संक्रमित आढळले; 92926 लोक झाले रिकव्हर, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशीव वाढली, देशात आतापर्यंत  54.85 लाख केस

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 तासात 92 हजार 926 बरे झाले आणि 1 हजार 135 लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत 54 लाख 85 हजार 612 संक्रमित आढळले आहेत. तर 43 लाख 92 हजार 650 लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 87 हजार 392 रुग्ण समोर आले. 92 हजार 926 बरे झाले आणि 1 हजार 135 लोकांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी वाढली आहे.

मृतांचा आकडा 87 हजारांच्या पार
देशातील मृतांचा आकडा आता 87 हजार 909 झाला आहे. सध्या 10 लाख 04 हजार 274 रुग्ण असे आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे रुग्ण घरात राहून किंवा मग रुग्णालयात आपल्यावर उपचार करुन घेत आहेत.

तर महाराष्ट्रात आतापर्यंत 12 लाख 8 हजार 624 केस समोर आल्या आहेत. 8 लाख 84 हजार 341 संक्रमित बरे झाले आहेत. 2 लाख 91 हजार 238 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 32 हजार 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...