आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

देशात कोरोना:बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 23 लाख पार, देशात आतापर्यंत 30.79 लाख प्रकरणे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीरम इन्स्टिट्यूटने कोविशील्ड लस 73 दिवसांत येण्याचा दावा फेटाळला

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 30 लाख 79 हजार 925 झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या 23 लाख पार झाली आहे. आतापर्यंत 23 लाख 13 हजार 510 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 57 हजार 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यादरम्यान एका दिवसांत चाचण्यांच्या संख्येत 2 लाखांची घसरण झाली. देशात 21 ऑगस्ट रोजी 10 लाख 23 हजारांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या होत्या. मात्र 22 ऑगस्ट रोजी चाचण्यांमध्ये घट होऊन 8 लाख 1 हजार 147 चाचण्या झाल्या. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात 3 कोटी 52 लाख 92 हजार 220 लोकांचा तपासणी झाली आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे मागितली मेट्रो सुरू करण्याची परवानगी

यादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, सर्वांच्या सहकार्याने दिल्लीतील कोरोना परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. दिल्लीने ज्या प्रकारे संक्रमणाचा सामना केला तो जगभर चर्चेचा विषय आहे. दिल्लीत संसर्ग रोखण्यासाठी एकदाच लॉकडाउन लादला गेला आणि अनलॉक केल्यापासून परिस्थिती सतत सामान्य होत आहे.

आता सर्व कामे सुरू झाली आहेत. कोविड व्यवस्थापनामुळे येथे पुन्हा लॉकडाउन लादण्याची आवश्यकता भासली नाही. केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे दिल्लीत पुन्हा मेट्रो सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. ते म्हणाले की, ट्रायल म्हणून मेट्रो सुरू करण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकार लवकरच याबाबत निर्णय घेईल अशी मला आशा आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले - 73 दिवसांत कोविशील्ड बाजारात येण्याची बातमी चुकीची

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशिल्ट लसीच्या उपलब्धतेबाबत माध्यमांत केले जात असलेले दाव्यांचे खंडन केले. निवेदनात म्हटले आहे की, या क्षणी सरकारने आम्हाला फक्त लस तयार करण्याची आणि भविष्यातील वापरासाठी ती ठेवण्याची परवानगी दिली आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर आणि नियामक मान्यता मिळाल्यावरच लस बाजारात येईल.

काही मीडिया रिपोर्टमध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले होते की, कोविशील्ड 73 दिवसात उपलब्ध होईल.सायरस पूनावाला यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूट या व्हॅक्सीनच्या प्रॉडक्शनचे काम बघत आहे. शनिवारी याच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला सुरुवात झाली आहे.