आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:कर्नाटकातही 2 जानेवारीपर्यंत नाइट कर्फ्यू; महाराष्ट्रात पुन्हा सुरू होणार पर्यटन स्थळे, वॉटर स्पोर्टसलाही मंजूरी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात मंगळवारी 23 हजार 880 केस समोर आल्या आणि 27 हजार 32 रुग्ण बरे झाले.

महाराष्ट्रानंतर आता कर्नाटकातही आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी बुधवारी ही घोषणा केली. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. 2 जानेवारीपर्यंत हा आदेश लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील घेण्यात येईल. असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात पुन्हा सुरू होणार पर्यटन स्थळे

दरम्यान महाराष्ट्र सरकारने राज्यात पुन्हा एकदा कंटेनमेंट झोन बाहेरील पर्यटनस्थळे सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. सर्व ठिकाणी कोविड-19 च्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. यासोबतच वॉटर स्पोर्ट्स, नौका विहार, पार्क, इंडोर एंटरटेनमेंट अॅक्टिव्हिटीला देखील मंजुरी देण्यात आली आहे.

केरळमध्ये परिस्थिती बिकट झाली

देशात कोरोना संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये आता केरळची परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. येथे दररोज 5-6 हजार प्रकरणे समोर येत आहेत. येथे मंगलवारीही 6049 नवीन रुग्ण समोर आले. हे आकडे काही दिवसांपूर्वी टॉपवर असलेल्या महाराष्ट्रातील प्रकरणांपेक्षाही दुप्पट आहेत. महाराष्ट्रात मंगळवारी 3106 समोर आल्या. केरळमध्ये सध्या 61 हजार तर महाराष्ट्रात 58 हजार अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

देशात मंगळवारी 23 हजार 880 केस समोर आल्या आणि 27 हजार 32 रुग्ण बरे झाले. 329 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस 3498 ने कमी झाल्या. देशात आतापर्यंत 1 कोटी 99 लाख केस समोर आल्या आहेत. 96.62 लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर 1.46 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 2.87 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...