आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पॉझिटिव्हिटी रेट नॅशनल एव्हरेज 5.6% पेक्षा जास्त; महाराष्ट्र-गोव्यात ही आकडेवारी 12% च्या पुढे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 1.06 कोटी लोक संक्रमित

देशात कोरोनाचे प्रकरणे सातत्याने कमी होत आहे. दरम्यान काही राज्यांमध्ये अजुनही पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. 14 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट राष्ट्रीय सराकरी 5.6% पेक्षा खूप जास्त आहे. म्हणजेच देशात रोज होत असलेल्या टेस्टिंगमध्ये 100 मधून 5 किंवा 6 लोक संक्रमित आढळत आहेत.

महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये आढळत असलेल्या नवीन रुग्णांचे आकडे चकीत करतात. येथे पॉझिटिव्हिटी रेट 12% पेक्षाही जास्त आहे. महाराष्ट्रात 100 मधून 14 तर गोव्यामध्ये 12 लोक संक्रमित आढळत आहेत. पॉझिटिव्हिटी रेटच्या प्रकरणामध्ये चंदीगड तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 100 मधून 10 लोक संक्रमित आढळत आहेत.

देशात आतापर्यंत 1.06 कोटी लोक संक्रमित
देशात शुक्रवारी 14,321 नवीन संक्रमित आढळले. 17,166 रुग्ण बरे झाले आणि 153 जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 1.06 कोटी केस समोर आल्या आहेत. यामधून 1.03 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. तर 1.53 लाख रुग्णांनी जीव गमावला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

तर महाराष्ट्रात शुक्रवारी 2,779 लोक कोरोना संक्रमित आढळले. 3,419 रुग्ण बरे झाले आणि 50 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 20.03 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामधील 19.06 लाख लोक बरे झाले आहेत. तर 50,684 संक्रमितांनी जीव गमावला आहे. 44,926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.