आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:भारतात 10 लाखांच्या लोकसंख्येमागे केवळ 64 मृत्यू; हा आकडा यूके आणि ब्राझीलपेक्षा 10 टक्के कमी, देशात आतापर्यंत 56.43 लाख

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त 18390 रुग्ण वाढले, मात्र 20 हजार 206 लोक बरेही झाले आहेत

देशातील कोरोना रूग्णांची संख्या वाढून 56 लाख 43 हजार 481 झाली आहे. दुसरीकडे, चांगली बातमी अशी आहे की मागील पाच दिवसांपासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मंगळवारी 80 हजार 321 रुग्ण आढळले, तर 87 हजार 7 लोक बरे झाले आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहेत.

मंगळवारी 1056 लोक मरण पावले. अशाप्रकारे मृतांचा आकडा 90 हजार 22 झाला आहे, परंतु चांगली बातमी अशी आहे की आपल्या देशात लोकसंख्येच्या प्रमाणात कमी मृत्यू आहेत. भारतात दर 10 लाख लोकसंख्येमागे 62 मृत्यूमुखी पडले आहेत. तर जास्तीत जास्त ब्राझीलमध्ये 642 आणि अमेरिकेत 615 रुग्ण आहेत.

5 दिवसात नवीन रुग्णांच्या तुलनेत जास्त लोक झाले बरे

तारीखनवीन रुग्णबरे झालेले लोक
18 सप्टेंबर92,96995,512
19 सप्टेंबर92,57494,384
20 सप्टेंबर87,39292,926
21 सप्टेंबर74,4931,02,070
22 सप्टेंबर80,32187,007

तर महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी संक्रमितांपेक्षा जास्त लोक बरे झाले. 24 तासांमध्ये 18 हजार 390 नवीन रुग्ण समोर आले. तर विक्रमी 20 हजार 206 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 12 लाख 42 हजार 770 लोक संक्रमित झालेले आहेत. यामध्ये 9 लाख 36 हजार 554 लोक बरे झाले आहेत. तर 2 लाख 72 हजार 410 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...