आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:20 राज्यांमध्ये मृत्यूदर नॅशनल अॅव्हरेज 1.4% पेक्षा कमी, पंजाब टॉपवर, येथे प्रत्येक 100 संक्रमितांमधून 3 जणांनी जमावला जीव

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात बुधवारी 3913 नवीन कोरोना संक्रमित आढळले.

देश कोरोनाचा सामना चांगल्या प्रकारे करत आहे. 28 राज्य आणि आठ केंद्र शासित प्रदेशांमधून 20 मध्ये मृत्यूदर नॅशनल एव्हरेट 1.4% पेक्षा कमी झाला आहे. 3.2% सोबत पंजाब टॉपवर आहे. 2.6% सोबत महाराष्ट्रत दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्षद्वीप एकमेव असे केंद्र शासित प्रदेश आहे जेथे अशी कोणतीही केस आलेली नाही.

देशात बुधवारी 24 हजार 236 कोरोना संक्रमित आढळले. 29 हजार 364 रुग्ण बरे झाले. तर 302 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजे उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये 5450 ची घट झाली आहे. आता एकूण 1 कोटी 1 लाख 23 हजार लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 96.92 लाख बरे झाले आहेत. 1.46 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 2.81 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तर महाराष्ट्रात बुधवारी 3913 नवीन कोरोना संक्रमित आढळले. 7620 लोक बरे झाले आणि 93 जणांचा मृत्यू झाला. येथे कोरोना संक्रमणाचे आतापर्यंत 19.06 लाख केस समोर आल्या आहेत. यामधून 18.01 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 48 हजार 969 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 54 हजार 573 जणांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...