आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देश:सहा दिवसात 51 हजार अॅक्टिव्ह रुग्ण झाले कमी, 13 दिवसांपूर्वी सर्वात जास्त 24 हजार वाढले होते, देशात आतापर्यंत एकूण 57.30 लाख संक्रमित

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलग सहाव्या दिवशी संक्रमितांपेक्षा जास्त लोक झाले बरे ; 86703 नवीन केस आल्या, 87458 रुग्ण झाले बरे
  • देशात आतापर्यंत 91 हजारांपेक्षा जास्त मृत्यू, 46 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर केली मात

गेल्या सहा दिवसांपासून देशातील कोरोनाचे आकडे दिलासा देत आहेत. या दरम्यान नवीन प्रकरणांपेक्षा जास्त रुग्ण हे बरे झाले आहेत. बुधवारी संसर्ग झालेल्या 86 हजार 703 व्यक्ती समोर आल्या, तर 87 हजार 458 रुग्ण बरे झाले. आता 9.66 लाख रुग्ण उपचार घेत आहेत. 17 सप्टेंबर रोजी ही आकडेवारी सर्वात जास्त 10.17 लाख होती, म्हणजेच गेल्या सहा दिवसांत 51 हजार अॅक्टिव्ह केस कमी झाल्या आहेत. 12 सप्टेंबर रोजी सर्वात जास्त 24 हजार सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ झाली होती.

देशात आतापर्यंत 57 लाख 30 हजार 184 केस आल्या आहेत. 46 लाख 71 हजार 859 लोक बरे झाले आहेत. तर 91 हजार 173 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी 1123 रुग्णांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

दरम्यान रेल्वे राज्य मंत्र सुरेश अंगडी यांचे बुधवारी कोरोनाने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. दिल्ली एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अंगडी कर्नाटकच्या बेलगाम लोकसभा सीटचे खासदार होते. तर दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदियांना बुधवारी ताप आणि ऑक्सीजन लेव्हल कमी झाल्यानंतर दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले. 14 सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने सांगितले की, 22 सप्टेंबरला 9 लाख 53 हजार 683 सँपलची चाचणी करण्यात आली. यासोबतच देशात आतापर्यंत 6 कोटी 62 लाख 79 हजार 462 कोरोना सँपलटी चाचणी करण्यात आलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...