आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अपडेट:देशातील एकूण रुग्णांचा आकडा 32.21 लाखांच्या पुढे, तर महाराष्ट्रातील रुग्णांनी ओलांडला 7 लाखांचा टप्पा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी देशात 56 हजार 700 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशात कोरोना रुग्णांचा आखडा 32.21 लाखांच्या पुढे गेला आहे. सध्या देशभरात 32,21,639 रुग्ण असून, यातील 24,22,935 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, आतापर्यंत 59,471 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी www.covid19india.org नुसार आहे.

महाराष्ट्रात रुग्णांनी ओलांडला 7 लाखांचा टप्पा

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,03,823 झाली आहे. मंगळवारी 10,425 रुग्णांची नोंद झाली तर 329 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासोबतच एकूण मृतांचा आकडा 22,794 झाला आहे. सध्या राज्यात 1,65,921 रुग्णांवर उपचार सुरू असून, 5,14,790 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सरकारने अद्याप शाळा-कॉलेज सुरू करण्याचे निर्देश दिले नाहीतआरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, देशात ज्या कोणत्या सुविधा सुरू केल्या जात आहेत, त्यासाठी आरोग्य मंत्रालय एसओपी जारी करते. अद्याप शाळा-कॉलेजबाबत निर्णय झालेला नाही, त्यामुळे निर्णय झाल्यानंतर एसओपी जारी केली जाईल.

परिस्थिती सुधारल्यानंतर निर्णय घेतला जाईल

राज्य सरकारांच्या माध्यमातून केंद्राला पाठविलेल्या अभिप्रायात शाळा आणि पालकांनी परिस्थिती सामान्य झाल्यावरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. मुलांचे आरोग्य आणि जीवन याबद्दल तडजोड करण्याची किंवा घाई करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्याप घेतला जाणार नाही.

रिकव्हरी रेट वाढला

राजेश भूषण पुढे म्हणाले की, आज देशातील रिकव्हर झालेली प्रकरणे अॅक्टिव प्रकरणांच्या तुलनेत 3.4 पट जास्त आहेत. अॅक्टिव्ह केस एकूण प्रकरणांच्या फक्त 22.2% आहेत. रिकव्हरी दर आता 75% पेक्षा जास्त आहे. 24 तासात अॅक्टिव्ह प्रकरणात 6423 ची कपात झाली आहे. एकूण अॅक्टीव्ह प्रकरणांपैकी 2.70% प्रकरणे ऑक्सीजन सपोर्टवर आहेत.

एकूण मृतांपैकी 69% पुरुष

भूषण यांनी पुढे सांगितले की, आतापर्यंत कोरोनामुळे 58,390 मृत्यू झाली आहेत. यातील 69% पुरुष आणि 31% महिला आहेत. 36% 45-60 वयोगटातील आणि 51% 60 आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील.

दुसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरू

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या कोविड-19 व्हॅक्सिनच्या दूसऱ्या टप्प्याची ट्रायल मंगळवारपासून सुरू होणार आहे. व्हॅक्सिन तयार करण्यात सीरमने ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी एस्ट्राजेनेकसोबत करार केला आहे.

एसआयआयमध्ये सरकार आणि विनियामक प्रकरणांचे अतिरिक्त निर्देशक प्रकास कुमार सिंह यांनी सांगितले की, आम्हाला केंद्रीय औषधी मानक आणि नियंत्रण संघठणाची मंजूरी मिळाली आहे. आम्ही 25 ऑगस्टपासून भारती विद्यापीठ रुग्णालयात मानवी क्लिनिकल चाचणी सुरू करत आहोत.