आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:9 राज्यांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त सक्रीय रुग्ण, केरळ आणि हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात जास्त 8.7% रुग्णांवर उपचार सुरू

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या 24 तासांमध्ये 23 हजारांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली

देशात कोरोनाची प्रकरणे सतत कमी होत आहेत. गुरुवारी अॅक्टिव्ह केसमध्ये 1474 ची घट झाली आहे. देशात आता कोरोनाचे 2 लाख 80 हजार 373 रुग्णांवर उपचार सुरू आहे. 9 राज्ये असे आहेत जेथे 10 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केस आहेत. यामध्ये केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ़, कर्नाटक, राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशचा समावेश आहे.

देशात आता केवळ 2.8% अॅक्टिव्ह केस आहेत. केरळ आणि हिमाचलमध्ये सर्वात जास्त 8.7% रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केरळमध्ये आतापर्यंत 7 लाख 26 हजार 688 केस समोर आल्या आहेत. ज्यामध्ये 63 हजार 157 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर हिमाचल प्रदेशमध्ये 53 हजार 766 कोरोना प्रकरणे समोर आले आहेत. ज्यामध्ये 48 हजार 151 लोकांनी कोरोनावर मात केली आहे आणि 887 लोकांनी जीव गमावला आहे. राज्यात सध्या 4 हजार 681 अॅक्टिव्ह केस आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये 23 हजारांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली
देशात गुरुवारी 23 हजर 444 लोक कोरोना संक्रमित आढळले. 24 हजार 555 रुग्म बरे झाले आहेत. तर 337 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 1 कोटी 1 लाख 47 हजार 468 लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 97.17 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 1.47 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2.80 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...