आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासात 13232 रुग्ण आढळले, 13148 बरे झाले; 19 दिवसात पहिल्यांदाच संक्रमितांचा आकडा बरे होणाऱ्यांपेक्षा जास्त

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारी देशात 131 रुग्णांनी या महामारीमध्ये जीव गमावला.

देशात कोरोना संक्रमितांच्या घटत्या आकड्यांवर थोडा ब्रेक लागला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 13,232 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर 13,148 रुग्ण बरे झाले. 6 जानेवारीनंतर असे पहिल्यांदा झाले जेव्हा संक्रमित रुग्णांची संख्या बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त राहिली. तेव्हा 20,472 रुग्ण मिळाले होते आणि 19,689 बरे झाले होते.

रविवारी देशात 131 रुग्णांनी या महामारीमध्ये जीव गमावला. सक्रीय रुग्ण म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 57 ने कमी झाली. आतापर्यंत संक्रमणाचे 1.06 कोटी केस आल्या आहेत. यामधून 1.03 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. 1.53 लाख जणांनी जीव गमावला आहे, तर 1.81 लाख जणांवर उपचार सुरू आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

महाराष्ट्र राज्यात रविवारी 2752 लोक कोरोना संक्रमित आढळले आहेत. 1743 लोक रिकव्हर झाले आणि 45 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 20 लाख 9 हजार 106 लोक येथे संक्रमित झाले आहेत. यामध्ये 19 लाख 12 हजार 264 लोक बरे झाले आहेत. तर 50 हजार 785 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 44 हजार 831 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.