आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:सलग पाचव्या दिवशी 90 हजारांपेक्षा कमी प्रकरण आले समोर, सहा दिवसांनंतर बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन केस जास्त आल्या; आतापर्यंत 58.16 लाख संक्रमित

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी 82214 संक्रमित मिळाले, 77488 बरे झाले, 1144 जणांचा झाला मृत्यू
  • देशात आतापर्यंत 92 हजारांहून अधिक मृत्यू, 47 लाखाहून अधिक लोक झाले बरे
  • दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनासोबत डेंग्यूची लागण

देशात गुरुवारी कारोना संक्रमणाचे 82214 प्रकरण समोर आले. 77488 लोक बरे झाले आणि 1144 लोकांचा मृत्यू झाला. सहा दिवसांनंतर संक्रमितांची संख्या ठीक झालेल्या रुग्णांपेक्षा जास्त होती. तर दिलासादायक बाब म्हणजे सलग पाचव्या दिवशी, संक्रमितांची संख्या ही 90 हजारांपेक्षा कमी होती.

देशात आतापर्यंत 58 लाख 16 हजार 103 केस समोर आल्या आहेत. यामधून 47 लाख 52 हजार 991 रुग्ण बरे झाले आहे. तर मृतांची संख्या आता 92 हजार 270 झाली आहे. हे आकडे covid19india.org नुसार आहेत.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांना एलएनजेपी हॉस्पिटलमधून मॅक्स हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. 14 सप्टेंबरला त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. यापूर्वी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनाही कोरोना झाला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी म्हटले की, दिल्लीत कोरोनाची दुसरी लहर येऊन गेली आहे. सप्टेंबरमध्ये 4000 केस येणे महामारीच्या दुसऱ्या लहरीचे संकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...