आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:संक्रमितांचा आकडा 59 लाखांच्या पार, दिलासादायक म्हणजे आता अॅक्टिव्ह केस होत आहेत कमी, 14 दिवसांपूर्वी 9.73 लाख होते, अब 9.61 लाख

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी 85 हजार रुग्ण आढळले, 93 हजार बरे झाले, तर 1093 जणांचा झाला मृत्यू
  • देशात आतापर्यंत 59 लाख संक्रमित झाले आहेत, 48.46 लाख बरे झाले, 93 हजार 410 जणांचा झाला मृत्यू

देशातील कोरोना संक्रमणाचे आकडे पाहून आता थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठ दिवसांमधून सात दिवसात नवीन संक्रमितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शुक्रवारीही 85 हजार 465 संक्रमित समोर आले. तर 93 हजार 166 बरे झाले. यापेक्षा अॅक्टिव्ह केस सातत्याने कमी होत आहेत. 14 दिवसांपूर्वी 12 सप्टेंबरला 9.73 लाख अॅक्टिव्ह केस होते. तर 25 सप्टेंबरला हे 9.61 लाख झाले.

देशात आतापर्यंत 59 लाख 1 हजार 571 लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी 48 लाख 46 हजार 168 लोक बरे झाले आहेत, तर 93 हजार 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

गुरुवारी विक्रमी 14 लाख 92 हजार 409 लोकांची तपासणी करण्यात आली. कोरोना चाचणीची ही आकडेवारी एका दिवसात सर्वाधिक आहे. यापूर्वी 19 सप्टेंबर रोजी 12 लाख लोकांचे स्क्रिनिंग केले होते. 6.89 कोटी चाचण्या आतापर्यंत झाल्या आहेत.

प्रत्येकी 10 लाख लोकसंख्येमध्ये रुग्णांची संख्या वाढली आली आहे. आता दहा लाख लोकसंख्येमागे 4210 लोक संक्रमित सापडत आहेत. 20 सप्टेंबरपर्यंत 4200 रूग्ण आढळत होते.

बातम्या आणखी आहेत...