आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:गेल्या 24 तासांमध्ये केवळ 18 हजार 575 संक्रमित आढळले, या महिन्यात तिसऱ्यांदा हा आकडा 20 हजारांपेक्षा कमी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 1.01 केस आल्या आहेत. 97.60 लाख रुग्ण बरे झाले आहेत.

देशात कोरोना रुग्ण हे झपाट्याने बरे होत आहेत. यासोबतच अॅक्टिव्ह केसही कमी होत आहेत. शनिवारी केवळ 18 हजार 575 नवीन रुग्ण आढळले. 21 हजार 466 रुग्ण हे बरे झाले आहेत. तर 280 जणांचा मृत्यू झाला. अॅक्टिव्ह केस 3181 ने कमी झाल्या आहेत. अॅक्टिव्ह केस म्हणजे ज्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

डिसेंबरमध्ये तिसरी वेळ आहे जेव्हा नवीन केस 20 हजारांपेक्षा कमी आल्या आहेत. यापूर्वी 16 डिसेंबरला 18 हजार 172 रुग्ण आढळले होते. 21 डिसेंबरला 19 हजार 147 आणि 26 डिसेंबरला 18 हजार 575 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यापूर्वी 1 जुलैला 19 हजार 430 केस आल्या होत्या. यानंतर 15 डिसेंबरपर्यंत एकदाही हा आकडा 20 हजारांपेक्षा कमी राहिला नव्हता.

देशात आतापर्यंत 1.01 केस आल्या आहेत. 97.60 लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर 1.47 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

अॅक्टिव्ह केसच्या प्रकरणात 10 व्या नंबरवर
अॅक्टिव्ह रुग्णांच्या प्रकरणामध्ये भारत आता जगातील 10 वा देश आहे. येथे आता 2.80 लाख अॅक्टिव्ह केस आहेत. या प्रकरणात अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. येथे सर्वात जास्त 76 लाख अॅक्टिव्ह केस आहेत.

बातम्या आणखी आहेत...