आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देश:देशातील एकूण रुग्णसंख्या 34.55 लाखांच्या पुढे; काँग्रेस खासदार वसंतकुमार यांचा कोरोनामुळे मृत्यू, इंटरनॅशनल रेसलर विनेश फोगाट कोरोना संक्रमित

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 62,675 रुग्णांचा मृत्यू, सर्वात जास्त 23,775 मृत्यू महाराष्ट्रात

देशातील कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 34 लाखांच्या पुढे गेला आहे. शुक्रवारी 71 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. यासोबतच देशातील एकूण संक्रमितांचा आकडा 34,55,609 झाला आहे. चांगली बाब म्हणजे, यातील 26,40,710 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. वाईट म्हणजे, आतापर्यंत संक्रमणामुळे 62 हजार 675 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी covid19india नुसार आहे.

यादरम्यान, कोरोना संक्रमणामुले तमिळनाडुमधील कन्याकुमारीचे काँग्रेस खासदार एच वसंतकुमार यांचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जारी करुन, त्यांची तब्येत नाजुक असल्याचे सांगितले होते. 70 वर्षीय वसंतकुमार यांना 10 ऑगस्टला अपोलो हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते.

भारताची आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि तिचे प्रशिक्षक ओम प्रकाश दहिया कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शनिवारी 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रिडादिनी विनेशला खेळरत्न आणि ओम प्रकाश यांना अर्जुन अवॉर्ड मिळणार होता.

महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांचा आकडा 7,47,995 झाला आहे. शुक्रवारी 14,427 नवीन रुग्णांची नोंद झाली,तर 331 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 1,80,718 रुग्णांवर उपचार सुरू असून, 5,43,170 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यादरम्यान, 23,775 रुग्णांचा मृत्यूही झाला.