आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:7 राज्ये वगळता सर्व ठिकाणी 200 पेक्षा कमी संक्रमित आढळले, सलग तिसऱ्या दिवशी देशात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 1.07 कोटी रुग्ण आढळले आहेत

देशात गेल्या 24 तासांमध्ये केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, छत्तीसगढ, कर्नाटक, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्येच 400 पेक्षा जास्त प्रकरणं आले आहेत. इतर सर्व राज्यांमध्ये हा आकडा कमी आहे. बुधवारी देशात एकूण 11,556 नवीन संक्रमित आढळले. 14,261 बरे झाले आणि 123 जणांनी जीव गमावला आहे. हा सलग तिसरा दिवस होता जेव्हा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त होती.

देशात आतापर्यंत 1.07 कोटी रुग्ण आढळले आहेत. यामधून 1.03 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. 1.53 लाख जणांनी या महामारीमध्ये जीव गमावला आहे. तर 1.70 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

राज्यात बुधवारी 2,171 लोक कोरोना संक्रमित आढळले. 2556 लोक रिकव्हर झाले आणि 32 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 20 लाख 15 हजार 524 लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 19 लाख 20 हजार 6 लोक बरे झाले आहेत. 50 हजार 894 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 43 हजार 393 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...