आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:नवीन वर्षापूर्वी सुखद बातमी, 24 तासात केवळ 16 हजार नवीन संक्रमित, हे गेल्या 188 दिवसांमध्ये सर्वात कमी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात सोमवारी 2498 नवीन केस समोर आल्या.

देशात कोरोनाचे आकडे हे अजून दिलासा देणारे झाले आहेत. सोमवारी केवळ 16 हजार 72 केस आल्या. हा आकडा 23 जूननंतर सर्वात कमी आहे. तेव्हा 15 हजार 656 केस आल्या होत्या. गेल्या 24 तासांमध्ये 24 हजार 822 रुग्ण बरे झाले आहे. 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केसमध्ये 9011 ची घट झाली आहे. आता केवळ 2.67 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आतापर्यंत एकूण 1.02 कोरोना संक्रमित आढळले आहेत. यामधून 98.06 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 1.48 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात सोमवारी 2498 नवीन केस समोर आल्या. 4501 लोक बरे झाले आणि 50 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 19.22 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 18.11 लाख रुग्ण ठिक झाले आहेत. तर 57 हजार 159 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आता 49 हजार 305 झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...