आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासात नवीन प्रकरणे 11 हजारांनी वाढून जवळपास 19 हजार झाले, मात्र चिंतेची बाब नाही, छत्तीसगढमधील जुन्या रुग्णांमुळे वाढला आकडा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत देशात एकूण 1.07 कोटी प्रकरणे समोर आली आहेत

देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना संक्रमणाची 18,910 नवीन प्रकरणे वाढली आहेत. एक दिवसपूर्वी 11,556 रुग्ण समोर आले होते. मात्र ही वाढ चिंतेची बाब नाही. छत्तीसगढमध्ये गेल्या 10 महिन्यांमध्ये 6,000 रुग्णांच्या फाइल हरवल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी या फाइल सापडल्या. यानंतर गुरुवारी राज्यात आकडे दुरुस्त करत 6,451 नवीन केस नोंदवण्यात आल्या. यामुळे देशातील संक्रमितांचा आकडा अचानक वाढला. छत्तीसगढमध्ये एक दिवसपूर्वी 439 केस आल्या होत्या.

देशात गुरुवारी 20,315 रुग्ण बरे झाले. 162 संक्रमितांनी जीव गमावला. अशा प्रकारे अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1,573 ची घट झाली आहे. आतापर्यंत एकूण 1.07 कोटी प्रकरणे समोर आली आहेत. यामधून 1.03 कोटी रुग्ण बरे झाले आहेत.1.54 लाख संक्रमितांनी या महामारीमध्ये जीव गमावला आहे. आता 1.69 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.

राज्यात गुरुवारी 2,889 लोक कोरोना संक्रमित आढळले. 3,181 रुग्ण बरे झाले आणि 50 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 20.18 लाख रुग्ण समोर आले आहेत. यामध्ये 19.23 लाख संक्रमित बरे झाले आहेत. तर 50,944 रुग्णांनी जीव गमावला आहे. सध्या 43,048 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.