आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:15 राज्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळण्याचा वेग 5% नी वाढला, पंजाबमध्ये डेथ रेट सर्वात जास्त

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे फोटो मुंबई रेल्वे स्टेशनचा आहे, येथे कोरोना टेस्टिंगनंतर सँपल ठेवत असताना आरोग्य कर्मचारी. - Divya Marathi
हे फोटो मुंबई रेल्वे स्टेशनचा आहे, येथे कोरोना टेस्टिंगनंतर सँपल ठेवत असताना आरोग्य कर्मचारी.
  • बिहारसह 5 राज्यांमध्ये 99% पेक्षा जास्त रिकव्हरी

देशात कोरोना रुग्ण आढळण्याचा वेग सलग वाढताना दिसत आहे. 15 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश असे आहेत, जिथे पॉझिटिव्हिटी रेट म्हणजेच रुग्ण आढळण्याचा वेग 5% पेक्षा जास्त आहे. सर्वात जास्त महाराष्ट्रात 13.2% पॉझिटिव्हिटी रेट आहे. या व्यतिरिक्त गोव्यामध्ये 11.1%, नागालँडमध्ये 9.3% आणि केरळमध्ये 9.2% या वेगाने संक्रमित आढळत आहेत.

डेथ रेटविषयी बोलायचे झाले तर पंजाब यामध्ये सर्वात पुढे आहे. येथे प्रत्येक 100 कोरोना रुग्णांमागे जवळपसा तीन लोकांचा मृत्यू होत आहे. डेथ रेट येथे देशात सर्वात जास्त 3.2% आहे. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रात 2.4% या वेगाने लोक जीव गमावत आहेत. सिक्किममध्ये 2.2% आणि पश्चिम बंगालमध्ये 1.8% डेथ रेटची नोंद करण्यात आली आहे.

बिहारसह 5 राज्यांमध्ये 99% पेक्षा जास्त रिकव्हरी
कोरोना रुग्ण वाढत असताना एक दिलासादायक वृत्त आहे. देशात 5 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश असे आहेत, जेथे 99% पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये बिहार, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, ओडिशा आणि आंध्र प्रदेश आहेत. सर्वात जास्त 99.7% रुग्ण अरुणाचल प्रदेशात बरे झाले आहेत.

24 तासांमध्ये 14 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले
मंगळवारी देशभरात 14 हजार 997 लोक कोरोना संक्रमित आढळले आहेत. 13 हजार 113 लोक रिकव्हर झाले आणि 98 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत येथे 1 कोटी 11 लाख 39 हजारांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1 कोटी 8 लाखा लोक बरे झाले आहेत. तर 1 लाख 57 हजार 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 67 हजार 183 रुग्ण असे आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...