आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:नवीन वर्षापूर्वी अॅक्टिव्ह केस 2.5 लाखांनी कमी होण्याची अपेक्षा, टेस्टिंगची संख्या 17 कोटींच्या पार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत एकूण 1.02 कोटी केस आल्या आहेत. यामधून 98.33 लाख रुग्ण बरे झाले आहेत.

देशात मंगळवारी कोरोनाचे 20 हजार 529 नवीन केस आल्या. 26 हजार 572 रुग्म बरे झाले आणि 285 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे 6339 अॅक्टिव्ह केस कमी झाल्या आहेत. आता 2.60 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोन दिवसात 15 हजार 350 अॅक्टिव्ह केस कमी झाल्या आहेत. हीच परिस्थिती राहिली तर पुढच्या दोन दिवसांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केस कमी होऊ शकतात. तेव्हा हा आकडा 2.50 लाखांपेक्षा कमी होईल. तिकडे देशभरात कोरोना टेस्टिंगचा एकूण आकडा 17 कोटींच्या पार गेला आहे.

आतापर्यंत एकूण 1.02 कोटी केस आल्या आहेत. यामधून 98.33 लाख रुग्ण बरे झाले आहेत.1.48 लाख संक्रमितांनी जीव गमावला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

महाराष्ट्रात मंगळवारी 3018 लोक संक्रमित आढळले. 5572 लोक बरे झाले आणि 68 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 19.25 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 18.20 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 49 हजार 373 जणांचा मृत्यू झाला तर 54 हजार 537 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...