आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना देश:रुग्णसंख्या 16.36 लाखांवर; यातील 10.57 लाख रुग्णांची कोरोनावर मात, मृतांमध्ये भारत 5 व्या स्थानी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात गुरुवारी 52 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद, तर 35,600 पेक्षा जास्त रुग्ण ठीक झाले

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 16 लाखांच्या पुढे गेला आहे. सध्या देशात 16,36,609 वर पोहचला आहे. गुरुवारी देशात 52 हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडले, तर 35,600 पेक्षा जास्त ठीक झाले. देशात सध्या 5,43,123 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, 10 लाख 57 हजार 280 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

यादरम्यान, एक वाईट बातमी समोर आली आहे. भारत आता जगातील सर्वात जास्त मृतांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहचला आहे. गुरुवारी झालेल्या मृत्यूनंतर भारताने इटलीला मागे टाकले आहे. भारतात आतापर्यंत 35 हजार 783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटलीमधील मृतांचा आकडा 35 हजार 129 आहे.

देशातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सरकारने 31 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, तमिळनाडू सरकारने राज्यातील लॉकडाउन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी म्हणाले की, जिल्हा कलेक्टर आणि आरोग्य जानकारांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

LIVE UPDATES:

  • मणिपूरमध्ये इंफालच्या रीजनल इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंस (रिम्स) मध्ये 48 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू. यासोबतच हा कोरोनामुळे होणारा राज्यातील दुसरा मृत्यू आहे.
  • महाराष्ट्रात 31 आणि त्रिपुरामध्ये 4 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. त्रिपुराचे सीएम बिप्लब कुमा देब यांनी बुधवारी सांगितले की, 1200 हेल्थ वर्कर्सच्या माध्यमातून एक आवश्यक हेल्थ सर्व्हे केला जाणा आहे. हा पूर्ण करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे.
  • महाराष्ट्र सरकारने तुर्तास इंडोर जिम आणि फिटनेस सेंटर्स उघडण्यास परवानगी नाकारली. 5 ऑगस्टपासून फक्त ओपन जिम सुरू होतील.
  • कोलकाता एअरपोर्टने राज्यातील लॉकडाउनमुळे सात दिवस सर्व फ्लाइट्स कँसल केल्या. एअरपोर्टनुसार, 5, 8, 17, 23, 24 आणि 31 ऑगस्टला कोलकाता एअरपोर्टवरुन सर्व फ्लाइट्स कँसल असतील.
  • तेलंगाणामध्ये गुरुवारी 1,811 नवीन रुग्ण सापडले तर 13 मृत्यू झाले. राज्यातील संक्रमितांचा आकडा 60 हजार 717 झाला आहे. तसेच, 15 हजार 640 अॅक्टिव केस आहेत.