आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:सलग 10 व्या दिवशी 90 हजारांपेक्षा कमी केस; अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 9.40 लाख झाली, ही गेल्या 11 दिवसांमधून सर्वात कमी, आतापर्यंत 62.23 लाख संक्रमित

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी 80500 केस आल्या, 86061 लोक झाले बरे, 1178 जणांचा झाला मृत्यू
  • 24 तासात 10.86 लाख टेस्ट करण्यात आल्या, आतापर्यंत 7.30 कोटींपेक्षा जास्त टेस्ट झाल्या

24 तासात देशात संसर्गाची 80500 नवीन प्रकरणे आढळली आणि 86061 लोक बरे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे सलग अकराव्या दिवशी देशात 90 हजारांपेक्षा कमी केस समोर आल्या. यापूर्वी 19 सप्टेंबर रोजी 92574 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. या दरम्यान केवळ दोनदाच असे झाले आहे जेव्हा नवीन केसपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती.

देशात आतापर्यंत संक्रमणाचे 62.23 लाख केस समोर आल्या आहेत. 51.84 लाख बरे झाले आहेत. मंगलवारी 1178 लोकांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या 97 हजार 529 झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

मंगळवारी 10 लाख 86 हजार 688 टेस्ट करण्यात आल्या. देशात आतापर्यंत 7.42 कोटी टेस्ट करण्यात आल्या आहेत. देशात प्रत्येक दिवशी सर्वात जास्त जवळपास 1.50 लाख टेस्ट उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये केल्या जात आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाविषयी चांगले वृत्त येत आहे. गेल्या चार दिवसांपासून रविवार वगळता इतर दिवशी नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. मंगळवारी महाराष्ट्रात 14 हजार 976 रुग्ण वाढले आणि 19 हजार 212 लोक बरेही झाले आहेत. राज्यात सध्या 19 लाख 75 हजार 923 लोक होम क्वारंटाइन आहेत. तर 29 हजार 922 लोकांना इंस्टीट्यूशनल क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...