आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:दिल्लीमध्ये 2 दिवसांचा नाइट कर्फ्यू, न्यू इअरचे सेलिब्रेशन करण्यावर बंदी, गोव्यात सेलिब्रेशनसाठी 45 लाख टूरिस्ट पोहोचले

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात गेल्या 24 तासांमध्ये 21 हजार 944 केस आल्या आणि 26 हजार 406 रुग्ण बरे झाले आहेत.

दिल्लीमध्ये नवीन वर्षात कोरोना गाइडलाइन मोडण्याची शक्यता पाहता दोन दिवसांचा नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. या दरम्यान सार्वजनिक स्थळांवर पाचपेक्षा जास्त लोक जमा होऊ शकणार नाही. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कुणी करणार नाही. हे निर्बंध आज रात्री 11 वाजेपासून 1 जानेवारी सकाळी 6 वाजेपर्यंत आणि 1 जानेवारी रात्री 11 वाजेपासून 2 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहतील. तिकडे गोव्यामध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी जवळपास 45 लाख लोक पोहोचले आहेत.

देशात गेल्या 24 तासांमध्ये 21 हजार 944 केस आल्या आणि 26 हजार 406 रुग्ण बरे झाले आहेत. 299 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये 4776 ची घट झाली आहे. आतापर्यंत एकूण 1.02 कोटी केस समोर आल्या आहेत. यामधून 98.59 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 1.48 लाख लोकांनी या महामारीमध्ये आपले प्राण गमावले आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

महाराष्ट्रात बुधवारी 3537 लोक संक्रमित आढळले. 4913 लोक बरे झाले आहेत आणि 90 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 19.28 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 18.24 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 49 हजार 463 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 53 हजार 66 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...