आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates 31 January 2021; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News Corona Vaccination News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अपडेट:हैदराबादमध्ये व्हॅक्सीन घेतल्याच्या 11 व्या दिवशी आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू, अधिकारी म्हणाले- मृत्यूचे कारण व्हॅक्सीन नाही

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोना रुग्णांच्या ठीक होण्याच्या संख्येत वाढ

हैदराबादमध्ये 55 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा व्हॅक्सीन घेतल्याच्या 11 व्या दिवशी शनिवारी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. व्हॅक्सीन घेतल्यानंतर मृत्यू होण्याची देशातील ही तिसरी घटना आहे. परंतू, आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे की, मृत्यूचे कारण व्हॅक्सीन नाही.

अधिकाऱ्यांचे म्हणने आहे की, आरोग्य कर्मचाऱ्याला 19 जानेवारीला व्हॅक्सीन लावली होती, पण त्यांनी श्वास घेण्याचा आणि चक्कर येण्याचा त्रास 29 जानेवारीला होत असल्याचे म्हटले होते. तेलंगाणाचे पब्लिक हेल्थ डायरेक्टर डॉ. जी श्रीनिवास राव यांनी सांगितल्यानुसार, त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू हर्ट अटॅकने झाला आहे. तसेच, त्यांना आधीपासूनच अनेक आजार होते.

दरम्यान, दिलासा देणारी बाब म्हणजे, देशातील कोरोना रुग्णांची आणि मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीमध्ये 3.44 लाख केसेस कमी आले असून, मृतांच्या संख्येतही 5 हजारांची घट झाली आहे. डिसेंबरमध्ये 7.85 लाख लोकांना संक्रमण झाल्याचे आढळून आले होते आणि 10 हजार 858 रुग्णांचा मृत्यू झाला होता. जानेवारीच्या आकडेवारीनुसार, 30 जानेवारीपर्यंत देशात एकूण 4.40 लाख लोक संक्रमित असून, 5057 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

97% रुग्ण ठीक झाले

देशात कोरोना रुग्णांची ठीक होण्याची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 97% रुग्ण ठीक झाले असून, सर्वाधिक रिकव्हरी रेट अरुणाचल प्रदेशचा आहे. येथील 99.6% रुग्ण ठीक झाले असून, दुसऱ्या नंबरवर ओडिशा आहे. येथील 99.1% रुग्ण ठीक झाले आहेत.