आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देश:रुग्णांचा एकूण आकडा 10.58 लाखांवर; यातील 6 लाख 62 हजार 722 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 10 लाख 58 हजार 130 झाला आहे. यातील 6 लाख 62 हजार 722 रुग्ण ठीक झाले असून 26 हजार 483 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात 3 लाख 64 हजार 597 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org नुसार आहेत.

महाराष्ट्रातील संक्रमितांच्या आकड्याने तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासात 8,348 नवीन रुग्ण सापडेल, यासोबतच एकूण आकडा 3,00,937 झाला आहे. यातील 1 लाख 60 हजार 357 रुग्ण ठीक झाले आहेत, तर 11 हजार 500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने बंगालमधील कमी कोरोना चाचण्यावर चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी बंगाल सरकारला पत्र लिहून चाचण्या वाढवण्यास सांगितले आहे. 

बातम्या आणखी आहेत...