आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासांत 18 राज्यांमध्ये बरे होणाऱ्यांपेक्षा नवीन रुग्ण जास्त आढळले; महाराष्ट्रात 4 महिन्यानंतर विक्रमी संक्रमितांची नोंद

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 तासांमध्ये 3,000 पेक्षा जास्त अॅक्टिव्ह केस वाढल्या

देशात लसीकरणासह कोरोना रुग्ण वाढण्याचा वेग वाढत आहे. गेल्या 24 तासांच्या आत 18 राज्यांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रात कोरोना संक्रमित आढळले आहेत. येथे 18 अक्टोबरनंतर पहिल्यांदाच 9,000 पेक्षा जास्त रुग्णांची ओळख झाली. बुधवारी महाराष्ट्रात 9,855 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 6,559 लोक रिकव्हर झाले आणि 42 जणांचा मृत्यू झाला.

24 तासांमध्ये 3,000 पेक्षा जास्त अॅक्टिव्ह केस वाढल्या
बुधवारी देशात 17,425 कोरोना रुग्ण आढळले. 14,071 लोक बरे झाले आणि 87 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1.11 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1.08 कोटी लोक बरे झाले आहेत. तर 1.57 लाख रुग्णांचा मृत्यू झाला. 1.70 लाख रुग्ण असे आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा प्रकारे बुधवारी अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत 3260 ची वाढ झाली आहे.

1.54 कोटी लोकांना लस देण्यात आली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, आतापर्यंत 1 कोटी 54 लाख 61,000 पेक्षा जास्त लोकांना कोरोना लस देण्यात आलेली आहे. यामध्ये 67.75 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोज देण्यात आला. तर 28.25 लाख लोकांना दोन्हीही डोज देण्यात आले आहेत. अशाप्रकारे 57.62 लाख फ्रंटलाइन वर्कर्सला पहिला डोज देण्यात आला आहे. तर 3,277 लोकांना दोन्हीही डोज देण्यात आले आहेत. गंभीर आजार असणाऱ्या 45 ते 60 वर्षांच्या 1.04 लाख आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 8.44 लाख लोकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...