आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी सांगितले की, केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत कोरोना व्हॅक्सीन पोहोचवण्याची तयारी करत आहे. यावर एक उच्च स्तरीय समिती काम करत आहे. ते म्हणाले की, ''जुलै 2021 पर्यंत 20-25 कोटी भारतीयांपर्यंत कोविड-19 व्हॅक्सीन पोहोचवण्याचे लक्ष्य आहे. तोपर्यंत व्हॅक्सीनचे 40 ते 50 कोटी डोस प्राप्त करण्याचे आमचे ध्येय आहे.'' या नियोजनावर काम सुरू आहे.
डॉ. हर्षवर्धन पुढे बोलताना म्हणाले, "व्हॅक्सीन तयार झाल्यानंतर लसीकरणाचे काम होईल. आरोग्य मंत्रालयाने यासाठी एक फॉर्म तयार करत आहे. यामध्ये सर्व राज्ये अशा लोकांची माहिती देतील, ज्यांना लसीची पहिली आवश्यकता आहे. विशेषतः कोविड-19चे व्यवस्थापनातील आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी इत्यादींचा समावेश आहे. ऑक्टोबरपर्यंत या योजनेवर काम होईल. लसीच्या साठवणुकीसाठी राज्यातून कोल्ड चेनशिवाय लस साठवण आणि वितरणासंदर्भातही माहिती घेण्यात आली आहे."
आतापर्यंत 65.65 लाख रुग्ण
देशात आतापर्यंत 65 लाख 65 हजार प्रकरणे समोर आली आहेत. यातील 55 लाख 23 हजार लोक बरे झाले तर देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यांचा दर सरासरी 1.6% आहे. यापैकी 9 हजार रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.
देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यांचा दर सरासरी 1.6%
देशातील कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण पुन्हा एकदा कमी झाले आहेत. शनिवारी 75 हजार 479 केस समोर आल्या, तर 81 हजार 655 रुग्ण बरे झाले आहेत आणि 937 रुग्णांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केसमध्ये 7116 रुग्ण कमी झाले आहेत. देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यांचा दर सरासरी 1.6% आहे. यामध्ये पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि पुद्दूचेरीमध्ये हा दर 2-3% आहे.
मृतांचा दर सर्वात जास्त पंजाब मध्ये 3% आहे. यानंतर महाराष्ट्रात 2.6%, गुजरातमध्ये 2.5%, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि पुद्दूचेरीमध्ये हा दर 1.9 तर मध्य प्रदेशात 1.8% आहे.
झारखंड, छत्तीसगड, मेघालय, आंध्र प्रदेश, मणिपूर, तेलंगणा, बिहार, ओडिशा, आसाम, केरळ, नागालँड, अरुणाचल प्रदेश, दादरा आणि नगर हवेली आणि मिझोरममध्ये हे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. मिझोरममध्ये आतापर्यंत 2103 घटना घडल्या आहेत, तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.