आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अपडेट:3.5% रुग्ण ऑक्सीजन सपोर्टवर, 2% आयसीयूत तर 0.5% संक्रमित व्हेंटिलेटरवर- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा शुक्रवारी 40 लाखांच्या पुढे गेला. आतापर्यंत देशात 40 लाख 12 हजार 630 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चांगली बाब म्हणजे यातील 30 लाख 86 हजार 545 रुग्ण ठीक झाले आहेत. दरम्यान, आतापर्यंत 69 हजार 214 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.ही आकडेवारी covid19india नुसार आहे.

महाराष्ट्रात मागील 24 तासात रेकॉर्डब्रेक 19 हजार 218 जणांना कोरोनाची लागण झाली. यासोबतच राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 8 लाख 63 हजार 62 झाला आहे. यातील 6 लाख 25 हजार 773 जण ठीक झाले असून, 2 लाख 10 हजार 978 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, आतापर्यंत राज्यात 25 हजार 964 जणांना मृत्यू झाला आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या गंभीर प्रकरणांची माहिती दिली आहे. यात सांगण्यात आले की, देशात सध्या 3.5% रुग्ण ऑक्सीजन सपोर्टवर आहेत, 2% आयसीयू आणि 0.5% संक्रमितांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

दिलासादायक म्हणजे 8 राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 80% पेक्षा जास्त आहे. तर 16 राज्य असे आहेत, जेथे 70 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. गुरुवारी 67 हजार 491 रुग्ण बरे झाले आहेत.

8 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश, जेथे रिकव्हरी रेट चांगला आहे

राज्यरिकव्हरी रेट
दिल्ली87.8%
बिहार87.9%
अंदमान अँड निकोबार87.6%
दादर अँड नगर हवेली87.8%
तमिलनाडु86.6%
राजस्थान82.6%
गुजरात81%
नागालँड

81.5%