आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकन फार्मा कंपनी फायझरने शुक्रवारी मोठी घोषणा केली. कंपनीने कोरोना व्हॅक्सीनच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी भारत सरकारला दिलेला अर्ज मागे घेतला आहे. बुधवारी 3 फेब्रुवारीलाच ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने फायझरच्या अर्जाचा रिव्हू केला होता. कमिटीने कंपनीला ट्रायलसंबंधीत माहितीही मागितली होती. ज्यानंतर कंपनीने शुक्रवारी अर्ज परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीने अशी माहिती दिली की, ते भारतीय प्राधिकरणाशी संपर्कात राहतील आणि नंतर पुन्हा मंजुरीसाठी अर्ज करतील. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंजुरी दिलेली फायझर ही जगातील एकमेव कोरोना लस आहे.
मृत्यूदरात .07% ची घट
दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट होत आहे. डेथ रेट 1.44% ने कमी होऊन 1.37% झाला आहे. प्रत्येक दिवशी आता 200 पेक्षा कमी लोकांचा मृत्यू होत आहे. 15-16 असे राज्या आहे जिथे आता संक्रमणामुळो कुणाचाही मृत्यू होत नाहीये.
कोरोनाचे सक्रिय प्रकरणे म्हणजेच ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांचा आकडा आता 1.48 वर आला आहे. हा गेल्या 8 महिन्यात सर्वात कमी आहे. यापूर्वी 12 जूनला 1.46 लाख सक्रिय प्रकरणे होते. देशात 29 राज्य आणि सात केंद्र शासित प्रदेशांमधून 20 मध्ये 1-1 हजारांपेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या राज्यांमध्ये केवळ 6,450 सक्रिय प्रकरणे आहेत.
देशात गुरुवारी 12,401 संक्रमित आढळले. 15,888 बरे झाले आणि 120 जणांनी जीव गमावला. आतापर्यंत 1.08 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 1.04 कोटी बरे झाले आहेत. तर 1.54 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात गुरुवारी 2,736 लोक कोरोना संक्रमित आढळले. 5,339 लोक रिकव्हर झाले आणि 46 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 20 लाख 36 हजार 2 लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 19 लाख 48 हजार 674 लोक बरे झाले आहेत. तर 51 हजार 215 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 34 हजार 862 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.