आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:आज 4 लाखांपेक्षा कमी होऊ शकतात अॅक्टिव्ह केस, या 138 दिवसांत सर्वात कमी, आतापर्यंत 96.44 लाख केस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 96 लाख 44 हजार 529 लोक संक्रमित झाले आहेत.

देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह केस सातत्याने कमी होत आहे. आज अॅक्टिव्ह केसची संख्या 4 लाखांपेक्षा कमी होऊ शकते. ही गेल्या 138 दिवसांमध्ये सर्वात कमी असेल. सध्या 4 लाख 2 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापूर्वी 20 जुलैला देशात 4 लाख एक हजार 709 अॅक्टिव्ह केस होत्या.

तसेच, गेल्या एका आठवड्यात जवळपास 3 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर अॅक्टिव्ह केसमध्येही 6,397 घसरण झाली आहे. देशात आतापर्यंत 96 लाख 44 हजार 529 लोक संक्रमित झाले आहेत. तर 90 लाख 99 हजार 946 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 1 लाख 40 हजार 216 झाली आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

तर महाराष्ट्रात शुक्रवारी 5229 लोक संक्रमित आढळले. 6776 लोक रिकव्हर झाले आणि 127 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत संक्रमणामुळे 18 लाख 42 हजार 587 प्रकरणे समोर आले आहेत. यामध्ये 83 हजार 859 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर 17 लाख 10 हजार लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आता 47 हजार 599 झाली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser