आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:कोरोना टेस्टिंगने 20 कोटींचा आकडा ओलांडला; आरोग्यमंत्री म्हणाले - 'मार्चमध्ये 50 लाखांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाणार लस'

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोनाच्या 7 लसींवर काम सुरू आहे.

देशात कोरोना टेस्टिंगचा आकडा 20 कोटींच्या पार गेला आहे. यामध्ये 1 कोटी 8 लाख 54 हजार म्हणजेच 5.39% लोक संक्रमित आढळले. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 1 कोटी 5 लाख 79 रुग्णही बरे झाले आहेत. संक्रमणाने 1 लाख 54 हजार 956 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 45 हजार 953रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान लसीकरणाविषयी एक चांगले वृत्त आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्गमध्ये सुरू होईल. त्यांनी लोकसभेमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण प्रक्रिया मार्चच्या कोणत्याही आठवड्यात सुरू होऊ शकते. यामध्ये 50 वर्षांपेक्षा अधीत वयाच्या लोकांना लस दिली जाईल. 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या हाय रिस्क असणाऱ्या लोकांना प्राधान्याने ही लस दिली जाईल. व्हॅक्सीनेशनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आतापर्यंत देशातील 52 लाख 90 हजार पेक्षा जास्त हेल्थ केअर आणि फ्रंट लाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. या सर्वांना 13 फेब्रुवारीपासून व्हॅक्सीनचा दुसरा डोज दिला जाईल.

अजून 3 लसींची क्लिनिकल ट्रायल सुरू
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, देशात कोरोनाच्या 7 लसींवर काम सुरू आहे. यामधील 3 लसींचे क्लिनिकल ट्रायल सुरू झाले आहे. त्यांनी सांगितले की, देशात 3 कोटी हेल्थ वर्कर्सला मोफत व्हॅक्सीन दिली जात आहे. यासाठी पीएम केअर फंड्सने मदत मिळाली आहे.

22 देशांमधून लसीसाठी मागणी
डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, जगातील 22 देशांमधून लसीसाठी मागणी आहे. यामध्ये अफगानिस्तान, अल्जीरिया, बांग्लादेश, भूटान, ब्राझील, इजिप्ट, कुवैत, मॉरीशस, मालदीव, मंगोलिया, सउदी अरब, म्यांमार, नेपाल, ओमान, मोरोक्को, साउथ अफ्रीका, श्रीलंका आणि UAE सारख्या देशांचा समावेश आहे. यामध्ये 15 पेक्षा जास्त देशांना 2 फेब्रुवारीपर्यंत अनुदान म्हणून 56 लाख डोज देण्यात आले आहेत. तर कॉन्टॅक्ट म्हमऊन 105 लाख डोज देण्यात येत आहेत.